दिवाळीनिमित्त रस्त्यावरच्या भुकेल्यांना डबे देत आहोत…
रस्त्यावर वेदनेने विव्हळत पडलेल्या लोकांची ऑपरेशन करत आहोत…
ज्यांना पाय नाहीत परंतु तरीही ते काम करत आहेत अशा दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर देत आहोत…
जे अंध बांधव आहेत अशांना व्यवसाय टाकून देत आहोत…
अंध बांधवांच्या डोळ्यात रोषणाई पाहत आहोत…
ज्यांच्या घरात अठराविश्वे अंधार आहे तिथे जावून एक पणती लावत आहोत…
कडू आठवणीत ज्यांचं आयुष्य गेलं अशांच्या हातावर एक गोड लाडू ठेवत आहोत…
दिवाळी, दिवाळी म्हणजे याहून काय वेगळी असते राव!!!
सर लोक मंदिरातल्या दगडाच्या मूर्ती ची पूजा करतात कोण जाने तो देव कोणाला पावतो की नाही, पण आपण तर प्रत्यक्ष देवच आहात
आपणास शतःशः प्रणाम।🙏