२३ फेब्रुवारी

सोहम, माझा मुलगा… आज त्याचा वाढदिवस! आज 16 वर्षांचा झाला तो..!

आईबाप आपल्या मुलाच्या नावे FD करत असतील, किंवा आणखी काही तरतुदी करत असतील..!

मी आणि मनिषाने, २३ फेब्रुवारी २०१४ ला त्याच्या नावे, Social Health And Medicine (SOHAM) नावाची संस्था सुरु केली… आज हि संस्था ५ वर्षांची झाली..!

या संस्थेच्या माध्यमातुन शंभरपेक्षाही जास्त ऊपक्रम डॉ. मनिषा राबवत आहे… त्यापैकी “भिक्षेक-यांचे डॉक्टर” हा आमचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प..!

या प्रकल्पाच्या माध्यमातुन काम करतांना आजी आजोबासमान वृद्ध भिक्षेक-यांनी आम्हांस आशिर्वाद दिलेत..!

दरवर्षी २३ फेब्रुवारीला मी आणि मनिषा या आशिर्वादाची FD सोहमच्या नावावर करत आहोत, जी कधीच मोडता येणार नाही..!

याच आशिर्वादाच्या FD च्या मिळणाऱ्या व्याजावर मी आणि मनिषा, आम्ही जगत आहोत… अत्यंत आनंदाने..!

सोहम हा आमचा मुलगा, सोहम ट्रस्ट ही आमची मुलगी… मी आणि मनिषा… आमचं हे चौकोनी कुटुंब..!

याच आमच्या चौकोनाच्या चारही कोनांवर माझ्या वृद्ध भिक्षेक-यांची कौतुकाची, प्रेमाची, मायेची आणि जिव्हाळ्याची झालर आहे, पताका आहे..!!!

बास की; जगायला अजुन काय लागतंय राव..!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*