इनिसपेक्टर हा ब्लॉग एका भीक मागणा-या मुलाच्या शिक्षणासंदर्भात लिहीला होता.
त्याचे वडील हा त्याच्या शिक्षणातला मुख्य अडथळा होते, कारण या भीक मागणा-या मुलाच्या जीवावरच ते जगायचे…
गेल्या तीन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर त्याच्या वडिलांनाही आता तयार केलंय… त्यांनाही स्वप्नं दाखवलीत..!
ते आता तयार झालेत आनंदाने, मुलाला शाळेत टाकायला..!
आधी हे मलाच तोडायची, मारायची भाषा करत होते… असो..!
या त्याच्या वडीलांना धाक दाखवुन मी या मुलाला केव्हाच उचलुन नेलं असतं… सोपं होतं खुप ते माझ्यासाठी..!
पण माझ्या तत्वात ते बसत नाही..!
धाक आणि जबरदस्तीने बरंच काही जिंकता येतं… पण ते जिंकणं नसतंच..!
तो असतो केवळ जय… शरीरावर मिळवलेला…
असे लोक आतुन धुमसत राहतात, मनाने आपले कधीच होत नाहीत..!
शरीरावर जय मिळवता येत असेलही, पण मनावर जय नाही मिळवता येत धाकानं… ती जबरदस्ती असते..!
जबरदस्ती नव्हती करायची मला… मनं जिंकायची तर प्रेमानेच..!
वेळ झाला जरा, पण यालाही जिंकलं…
महाशिवरात्रीनंतर, आम्ही शाळेत ऍडमिशन घेवु या मुलाला..!
सोबत त्याचे आई वडिलही असतीलच, ते आनंदानं तयार आहेत आता…
एप्रिल पासुन हा शाळेत जाईल!
“इनिसपेक्टर” बनेल…!!!
केवळ तुमच्या पाठबळामुळे करु शकलो हे, मी फक्त माध्यम… !!!
Leave a Reply