हि एक मावशी परवा परवा पर्यंत लोकांचे शर्ट, स्त्रियांचे पदर ओढुन ओढुन भीक मागायची..!
खुप विनवण्या करुन शोपिसेस विकायला हिला तयार केलं, आधी तयारच होत नव्हती, शेवटी तीला सांगितलं, “एकच आठवडाभर काम कर, पैसे नाही मिळाले, तुला बरं नाही वाटलं तर पुन्हा भीक मागायला सुरुवात कर आणि मी आयुष्यात तुला पुन्हा काम कर असं सांगणार नाही..!”
या अटीवर ती तयार झाली..!
काम सुरु केलेल्या दिवसापासुन, ही मावशी शोपिसेस विकुन रोजचे ४०० रुपये कमवायला लागली आहे. तीला आता “कामाची” गोडी लागलीये..!
माझ्या माघारीही हे लोक काम करतात की नाही हे पाहण्यासाठी तीच्याही नकळत म्हणुन गुपचुप काढलेला हा व्हिडिओ…
भिकेसाठी लोकांचे शर्ट ओढणारी मावशी आज जीव तोडुन व्यवसाय करते हे पाहुन माझ्याही डोळ्यात आनंदाश्रु आले…
माझा हा आनंद आपणांशी शेअर करतांना खुप आनंद होतोय मला..!!!
परवा गंमतीनं हिला म्हणालो, “चल पुन्हा बसायचं का भीक मागायला…?” तर हसत म्हणाली, “चुलीत घाल त्या भिकंला..!”
खरंच भीक मागण्याची वृत्ती आणि गरज, चुलीत जळुन खाक व्हावी… मी वाट पाहतोय..!
Leave a Reply