नम्र आवाहन..!!!

नमस्कार!

हे एक पन्नाशीचे सद्गृहस्थ, मुळचे ओरिसाचे!

ओरीसातुन तरुणपणी घर सोडलं… पुण्यात येवुन कुक / आचारी म्हणुन काम करु लागले.

काही दिवसांनी पाठीतल्या मणक्यांत त्रास सुरु झाल्याने, पायातली ताकद गेली, आणि नोकरी सुटली. दुसरीही नोकरी कुठं मिळेना, तेव्हा केवळ जगण्याचा एक पर्याय म्हणुन गेल्या दोन वर्षांपासुन भीक मागतात….

शेवटी काम कराल या बोलीवर, तुम्हां सर्वांच्या साथीने यांची जबाबदारी घेतली.

साई समर्थ हॉस्पिटल, दारुवाला पुल, पुणे या माझ्या मित्रांच्या खाजगी दवाखान्यात ऍडमिट केलं.

आवश्यक त्या सर्व तपासण्या, उपचार करुन, येथील डॉक्टरांच्या तब्बल १० दिवसांच्या अथक प्रयत्नाने कालपासुन ते चालायला लागले आहेत…

शारीरीक व्यंगापोटी, नाईलाजाने भीक मागणारा माणुस, आता काम करण्यालायक झालाय..!

या सर्वांत आपणां सर्वांची शारीरीक, आर्थिक आणि मानसिक मदत तसेच माझ्या डॉक्टर मित्रांचे सहकार्य मिळाले..!

मी नेहमीप्रमाणे माणुस म्हणुन, मधला एक दुवा म्हणुन काम केलं..!

बाकी सर्व श्रेय मला मदत करणा-या तुम्हां सर्वांचं आणि माझ्या डॉक्टर मित्रांचं..!!!

तर, आता हे काम करण्यायोग्य झाले आहेत, तेव्हा माझी आपणांस एक विनंती की हॉटेल या व्यवसायाशी निगडीत कुणाच्या माहितीत काही जॉब असेल तर मला कृपया व्हाट्सऍप च्या माध्यमातुन कळवावे.

व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, हे गृहस्थ विना काठी थोडे अडखळत चालतात… काठीसह उत्तम चालतात..! पण आचारी म्हणुन काम उत्तम करु शकतात…

आणखी एक मदत अपेक्षित… आपल्या माहितीत, माझे हे लोक करु शकतील अशी जरा कमी कष्टाची आणि फार स्किल लागणार नाही अशी कामं उदा. वॉचमन, शिपाई, सिक्युरीटी गार्ड, झाडु मारणे, भाज्या निवडणे, अथवा अशाच प्रकारची कामे कोणाच्या पाहण्यात असतील तरी मला ती व्हाट्सऍप च्या माध्यमातुन कळवावीत. मी या कामांची माझ्याकडे नोंद ठेवुन, योग्यवेळी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधेन..!

या व्यक्तीबद्दल बोलायचं तर अगदी उद्यापासुन हे काम करायला तयार आहेत…

शारीरीक दृष्ट्या पायावर तर उभं केलंय… आता आर्थिकदृष्ट्याही उभं करण्याचा प्रयत्न करु..!

चला एका भिक्षेक-याला गांवकरी बनवु… एका भिक्षेक-याला कष्टकरी बनवु…

 

3 Comments

  1. Respected sir,tumchya kade bharpur patience asleli ek aji ani ajobanchi team ahe,tumhi jar hi team aajchya generation chya sangopanasathi lavlit tar khup chan hoil.aaj aai vadil kamavar aslyane baby day Care centers chi garaj ahe.tumhchya kade team ahe prem ani laksh deu shakel ashi…ani ajun tari ya kamasathi machines upyogat anta yet nahit tithe anubhavi mansech lagtat

  2. I would like to contribute financially to Soham Trust, to participate in the good work you are doing. Pl let me know whether I can pay by cheque- payee name and address for dispatch of cheque. If only bank transfer payment is accepted, pl send me bank account details

Leave a Reply

Your email address will not be published.


*