“ती” या नावाने मागे एक ब्लॉग लिहिला होता. यांत एका अपंग भिक्षेक-याच्या तुटलेल्या व्हिलचेअर बाबत माहीती दिली होती.
यांस अनुसरुन, आज तीन व्हिलचेअर्स पॉप्युलर सायकल ऍन्ड मोटार कंपनी, शनिवारवाड्याजवळ, लालमहल चौक, पुणे येथील नामांकित कंपनीत बुक केल्या आहेत.
शुक्रवारी दि. २६ एप्रिल रोजी या व्हिलचेअर्स मिळतील, त्याचदिवशी या व्हिलचेअर्सना, त्या व्यवसाय करण्यास उपयुक्त ठरतील या पद्धतीने, वेल्डिंग काम करणा-यांकडुन modify करुन घेणार आहोत.
उनवा-यापासुन संरक्षण व्हावे यासाठी ऑटो रिक्षा ला असते तसे छप्पर तसेच आजुबाजुला लोखंडी जाळी आणि वस्तु ठेवण्यासाठी छोटे कप्पे तथा विक्रीयोग्य वस्तु टांगुन ठेवण्यासाठी हुक्स अशा पद्धतीने ही व्हिलचेअर तयार होईल!
तीन अपंग भिक्षेकरी, जे या व्हिलचेअरचा वापर व्यवसाय करण्यासाठी करणार आहेत (भिक मागण्यासाठी नाही ) केवळ अशाच भिक्षेक-यांना प्रत्येकी एक याप्रमाणे व्हिलचेअर हस्तांतरीत करणार आहोत.
याविषयीच्या तारीख आणि वेळे विषयी पुन्हा कळवेनच!
आपण आलात तर त्यांचा उत्साह द्विगुणीत होईल..!
आपल्या मदतीवरच हे काम सुरु आहे, माझ्या कामाचे आपण अप्रत्यक्ष घटक आहात, तेव्हा काय काम चालु आहे, ते कशा पद्धतीने चालु आहे, निधीचा विनियोग कसा होत आहे, कुठं होत आहे, हे कळविणे मी माझे कर्तव्यच समजतो.
या सर्वांतुन एक पारदर्शक काम निर्माण व्हावे या हेतुने मी आपणांस माहिती देत असतो.
पुनश्च सर्वांना अभिवादन!
Leave a Reply