मी पेशंटला स्टेथोस्कोपने तपासतो, मला वाटतं मी आरती करतोय…
मी गोळ्या औषधं देतो , मला वाटतं मी देवाला नैवेद्य दाखवतोय…
ते वेदनामुक्त होवुन हसतात, मला वाटतं मला प्रसाद मिळाला…
प्रेमानं माझ्या गालावरनं त्यांचे खरबरीत हात फिरतात… मला वाटतं प्रत्यक्ष ईश्वर खाली येवुन आशिर्वाद देतोय..!
आता मला कुठल्याही मंदिर मशीद आणि चर्च मध्ये देव शोधण्याची गरज नाही, कारण रोज मी त्यांच्याबरोबरच असतो!
Leave a Reply