एका न सांगता येणाऱ्या आजारानं पछाडलेली ती…
आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर उभी… डॉक्टर म्हणाले, “दिवस कमी उरलेत… पण ऑपरेशन केलं तर वाचाल…”
ती खचली, ऑपरेशनचा खर्च कुठुन करायचा? कुणाचीतरी आई, कुणाचीतरी बायको, कुणाचीतरी मुलगी… सोडुन जाणार… अशीच कुत्र्या मांजरासारखी!
मला ती ६ महिन्यांपुर्वी भेटली, मला भाऊ मानलं… म्हणाली, “वाचव मला… पोरं हाईत माजी बारकी बारकी…” मी देव थोडाच होतो तीला वाचवायला?
तरी ऍडमिट केलं… भिका-यांच्या डॉक्टरच्या या बहिणीसाठी डॉक्टरांनी सगळं ज्ञान पणाला लावलं… ती वाचली, किमान आयुष्यतरी वाढलं… या डॉक्टर्सना माझा साष्टांग नमस्कार, हा खर्च करण्याची तुम्हांमुळे ऐपत आली, तुम्हांस मनापासुन प्रणाम, कर्ते करविते आपण आहात, मी नाममात्र !
मी फक्त “भाऊ” या शब्दाला जागलो… “भा” म्हणजे तीच्या दुःखाचा “भागीदार” आणि “ऊ” म्हणजे ऊसवलेलं आयुष्य शिवणारा… तो भाऊ..!
आज डिस्चार्ज वेळी तीनं तीच्या “भावनांना” वाट करुन दिली… मुकपणे… काय म्हणु यांना..? “भावना” कि “भाऊना” ?
Leave a Reply