गुजरातचा एक कापड व्यापारी, तिकडे धंद्यात खोट आली, पुण्यात नशीब आजमावायला आला, इथेही नशीबानं साथ दिली नाही..!
खुप प्रयत्नानंतरही हरला… आत्मविश्वास गमावुन बसला आणि शेवटी मी याच लायकीचा आहे म्हणत भिक्षेक-यांच्या लायनीत बसला..!
खुप वाईट वाटलं..!
मी याला आर्थिक मदत दिली नाही… पण, फक्त विझत चाललेल्या आत्मविश्वासाच्या निखा-यावर फुंकर मारली…
विझत चाललेली आग हळुहळु भडकली… हा पठ्ठ्या पुण्याच्या तुळशीबागेत कपड्याचाच व्यवसाय करतो, चार लोक कामाला आहेत…
हि आग भडकली यातच मला आनंद!
या आगीवरच चार जणांची चुल पेटेल आणि आत्मसन्मानाची ज्योत ही..!
जय हो..!!!
Leave a Reply