एक आज्जी – पुर्वी बरी परिस्थिती –
नातीला इंग्लिश मिडिअम स्कुलला टाकलं –
पुढं परिस्थिती पालटली – इतकी की भीक मागण्याची वेळ आली
सातवी पर्यंत आज्जीनं कसंबसं नातीचं शिक्षण रेटलं –
मिळणाऱ्या भिकेत खावं किती आणि शाळेची फी आणि इतर खर्च भागवावा कसा हि विवंचना!
शेवटी ठरलं –
आता शाळा बास – हिला पण बसु दे भीक मागायला –
पर्यायच नाही!
चला अजुन एक भिक्षेकरी वाढणार…
असा नाही तर तसा, आणखी एका मुलीचा बळी जाणार!
मी आजीशी बोललो, मुलीशी बोललो…
ज्या शाळेत ती सातवीपर्यंत शिकली…
त्याच ताराबाई मुथा कन्याशाळा, चिंचवड इथे आज पुन्हा हिची फी भरली, युनिफॉर्म, वह्या पुस्तकं घेतली… आणि शाळेत सोडायलाही मीच गेलो!
अगदी वर्गात बेंचवर बसवुन आलो..!
शाळेतुन निघतांना हसत म्हणाली, “मामा मी तुम्हाला काय गिफ्ट देवु?”
म्हटलं, “तुझं शिक्षण पुर्ण झालं, तुला नोकरी लागली की तु तुझ्यासारख्या मुलामुलींना पेन पेन्सिल घेवुन दे…”
“आजीच्या हातातला कटोरा काढुन फेकुन दे… हेच माझं गिफ्ट!”
तीला किती कळलं माहित नाही, पण ती हसली!
जातांना आजी म्हणाली, “ह्या वर्साचं केलंस… म्होरल्या वर्षीचं काय करु?”
म्हटलं, “पोरीला नोकरी लागेपर्यंतचं शिक्षण, वह्या पुस्तकं सारं मीच करणार आता..!”
म्हातारी हात चुंबुन रडायला लागली..!
केवळ आपल्या आशिर्वादानं आणि आपण आजपावेतो केलेल्या पैशाच्या मदतीनं, भविष्यातली भिक्षेकरी आज शाळकरी झाली..!
कुणाची Long-term जबाबदारी घेण्याचा आत्मविश्वास मला तुमच्याचमुळे मिळाला…
नतमस्तक आहे मी आपणांपुढं..!!!
काय लिहु अजुन..? थांबतो!
Good Job doctor saheb…