भिक्षेकरी आजी आजोबांच्या हातात पेन पेन्सिली, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशी पुस्तकं पाहुन… हातात सॅक पाहुन छान वाटतं ना..?
यांची मुलं तरी शिकावीत या प्रयत्नात आहोत, आणि याला यशही ब-यापैकी यायला लागलंय..!
शाळेची पुस्तकं, वह्या, दप्तरं, कंपास, शाळेची संपुर्ण फी, युनिफॉर्म अशा या ना त्या रुपात या शैक्षणिक वर्षात एकुण १६ विद्यार्थ्यांना मदत केलीय…
कायमची जबाबदारी घेतलीय..!
या वस्तु घ्यायला, मी याच आजीआजोबांना सोबत घेवुन जातो दुकानात..!
लहान मुलांसारखी मग “हे द्या, ते द्या” करत धिंगाणा घालतात ही म्हातारी माणसं…
दुकानदार माझ्यावर डोळे वटारतो… वटारु दे..!
ही माणसं गेलेलं बालपण जपताहेत… ते स्वप्नं विकत घेताहेत… “वस्तु” विकणा-या दुकानदाराला काय कळणार त्याचं मोल..?
हे घडतंय केवळ आपल्या पाठबळामुळे… आशिर्वादामुळं… म्हणुन याचं श्रेयही आपलंच!
प्रणाम आपणांस!
Leave a Reply