माहितीस्तव

ज्या माझ्या मुलाच्या हाताची कातडी पुर्ण सोलवटली होती, ज्याचा हात कापायला लागणार होता… त्या माझ्या पोराचं काल स्कीन ग्राफ्टिंग हे अवघड आणि अत्यंत Skilful असे ऑपरेशन झाले..!

डॉ. धनराज गायकवाड (९४२२३ ४२०४८) या माझ्या परम मित्राने हे ऑपरेशन पार पाडले…

केवळ मैत्रीखातर..!

मांडीची स्कीन काढुन हातावर चिकटवणे… हे कागद चिकटवण्याइतकं सोपं काम नाही..!

पण डॉ. धनराज ने ते सहज केलं… सर्व प्रकारच्या रिस्क घेवुन…

धनु… मित्र आहे माझा… पण तरी साष्टांग नमस्कार धनुला… एव्हढा मोठा डॉक्टर … पण माझ्यासारख्या भिका-याच्या मदतीला आला तो..!

माझ्या पोराचा हात नीट केला…

कापायला सांगितलेला हात वाचवला…

माझं हे पोरगं खुष आहे… आता काही दिवसांत काम करायला लागेल..!

एक भिक्षेकरी कष्टकरी होईल…

तुम्ही साथ दिलीत, म्हणुन हे घडतंय, माझा सहकारी विक्रम याने जीवाचं रान केलं या माझ्या पोरासाठी…

काय पुण्य केलं होतं मी आणि मनिषाने कोण जाणे… पण तुम्ही सर्वजण भेटलात..!

आम्ही नाममात्र आहोत खरंच… सर्व श्रेय… तुम्हांला, विक्रमला आणि डॉ. धनुला..!

मी ऋणात आहे…
तिथंच असु द्यावे..!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*