आपल्या भेटीच्या प्रतिक्षेत..!

आर्टिस्ट्री” प्रस्तुत “देणे समाजाचे…” हे सामाजीक संस्थांसाठी एक अनोखे व्यासपीठ आहे!

वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक संस्थांच्या कार्याचे प्रदर्शन एकाच छताखाली इथं मांडलं जातं..! या माध्यमातुन विविध क्षेत्रातील संस्था एकत्र येतात, आपापसांत विचारांची देवाणघेवाण होते…

संस्थेच्या कामाविषयी आदर असणारे समाजातील आपणांसारखे सहृदय यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांना भेटुन जातात, आशिर्वाद देतात, शुभेच्छा देतात, जमेल ती मदतही करतात..!

दरवर्षी भरणा-या या महोत्सवात या वेळीही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ३० सेवाभावी संस्थांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडले जाणार आहे .

वीणाताई गोखले” या सर्व कार्यक्रमाच्या सुत्रधार आणि सर्व संस्थांना जोडणारा एक दुवा..!

वीणा ताईंच्या सहकार्याने, आम्हीही या प्रदर्शनात सहभागी आहोत…

इतरवेळी निवांत अशी भेट होत नाही, पण २०, २१, २२ सप्टेंबर २०१९ हे तीनही दिवस आम्ही पुर्णवेळ या प्रदर्शनात असल्यामुळे भेटीगाठी साठी थोडा वेळ मिळु शकेल.

आपणांस या काळात येण्यास वेळ मिळाला तर मला आणि मनिषाला आपणांस भेटुन आशिर्वाद घेता येतील, सध्याच्या कामाविषयी आणि भविष्यात करणार असलेल्या काही प्रकल्पांविषयी बोलता येईल.

भुवड ताई व बाबा यांचीही भेट होवुन जाईल..!!!

दिनांक – २०, २१, २२ सप्टेंबर २०१९
वेळ   – सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत
स्थळ  – हर्षल हॉल, कर्वे रोड, पुणे

सादर प्रणाम, आपल्या भेटीच्या प्रतिक्षेत..!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*