- एक ताई, Gynec त्रासाने त्रासलेली, नुसतीच त्रासली नव्हती तर ऑपरेशन झाले नसते तर, जीवावर बेतलं असतं..!
नव्हे कुठल्याही क्षणी प्राणाला मुकली असती, इतकी शेवटची अवस्था..!
या ताईचं ऑपरेशन सप्टेंबर मध्ये केलं… आपल्या मुलासोबत ती निर्धोक आणि आनंदी आहे.
- अक्षरशः पायात किडे पडलेले बाबा, गेल्या एक महिन्यांपासुन ऍडमिट आहेत. संपुर्ण एक महिना जखम साफ करणे सुरु आहे.
आज ती पुर्ण नीट झाली.
यांच्यावरही येत्या दोन तीन दिवसांत Plastic Surgery करवुन घेत आहोत.
- पुर्वी भीक मागणारे, त्यानंतर माझ्या आवाहनाला प्रतिसाद देवुन भीक मागणं सोडुन स्वच्छता सेवक म्हणुन कामावर लागलेले…
काल अचानक भेटले..!
ब-याच प्रकारचे त्रास यांच्या मागे लागले आहेत. चालता येत नाही – बोलता येत नाही.
आज यांनाही ऍडमिट करत आहोत पुढील उपचारांसाठी.
- दोन दिव्यांग व्यक्ती – यांनीही भीक मागणं सोडलंय – चित्रकारीची आधीचीच अवगत असलेली कला – यांना चित्रकार म्हणुन जगासमोर प्रेझेंट करायचंय – या महिन्यात यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवतोय, याविषयी सविस्तर लिहिनच..!!!
Leave a Reply