चित्रकला प्रदर्शन

पुर्वी भीक मागणारा एक मुलगा… याला माणसांत यायचंय..! चित्रकार म्हणुन सन्मानानं जगायचंय..!

याच्या चित्राचं प्रदर्शन मांडलंय आम्ही..!!! हे प्रदर्शन फक्त चित्रांचं नाही, हे प्रदर्शन आहे एका जिद्दीचं..!

याला बोटं आणि तळहात नाहीत, म्हणुन, नशिबाची कुठलीही रेषा याच्या हातावरही नाही…

तरीही, यानं या हातावर नसलेल्या रेषांनाच, नशीब बनवलंय… कागदावर चितारलंय..!

हे प्रदर्शन आहे… आस्तित्वात नसलेल्या अशा रेषांचं..!!!

१७ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११ ते या वेळेत, P.N. GADGIL & SONS LTD, AUNDH, NEAR RELIANCE MALL, PUNE – Phone – 020- 25881555, 25881556, येथे आयोजीत करीत आहोत.

आपण वेळात वेळ काढुन आलात तर आम्ही सर्वचजण ऋणी राहु..!

खुप विक्री व्हावी, हा प्रदर्शनाचा हेतुच नाही!

ज्या समाजाने भीक मागत असताना मला हाकलुन दिलं, तोच समाज मी भीक मागणं सोडल्यावर माझा सन्मान करतो, हा मेसेज मला त्याला आणि इतर भिक्षेकरी वर्गाला द्यायचा आहे.!

लोक भिक्षेक-याला नाही, कष्टक-याला मान देतात…
हे बीज आम्हाला यांच्या मनात रुजवायचं आहे..!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*