केवळ माहीतीस्तव!!!

“आपा” नावाच्या ब्लॉग मधील ताईचं पत्र्याचं नविन घर बांधुन झालंय!
आपल्या घरात फरशा असतात… हिच्या घरात नुसतीच दगडं..!
साधी फरशी किंवा वाळु -सिमेंटचा थर टाकला तरी चालणार आहे (यालाच कोबा म्हणतात असं कळलं ) असं ती म्हणाली..!

तीनं आज विचारलं, “तुमकु जमेगा क्या भैय्या ..? नय तो हम वैसेच आडजेश्ट कर लेंगे..! तुमकु बी कायकु तकलीप?”
मी म्हटलं… एकवेळ डोक्यावर छप्पर नसलं तरी चालेल… पण पायाखाली “जमीन” हवीच गं!
आणि आभाळ आपलं नसतंच गं कधी… जमिनच आपली..!
जगतांना जमिनीवर… मेल्यावर जमिनीखाली… इतकाच काय तो फरक..!!!
बांधु आपण हा “कोबा”, काळजी करु नकोस!!!

“को”णत्यातरी “बा”जुने काहीतरी होईलच, आणि तयार होईल हा कोबा!
“को”णीतरी “बा”जुने बघत मदत करतच आहे… तयार होईलच हा “को – बा”!

मी ही “को”णाचातरी “बा”प आहे… तुझी लहान पोरं दगडावर झोपताहेत, मी कसं पाहु शकेन गं… तयार होईलच हा “को – बा”!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*