मी ऋणी आहे!

ज्या आज्ज्यांना दिसत नसल्यामुळे जागेवरुन उठताही येत नव्हतं, दुस-याच्या आधाराशिवाय एक पाऊलही चालता येत नव्हतं, त्या माझ्या आज्ज्या, आज कुणाच्याही आधाराशिवाय, ऑपरेशन नंतर काही दिवसांतच तुरुतुरु चालत चालल्या, कुणाच्याही आधाराशिवाय, ख-या अर्थानं स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.

हे श्रेय माझं नव्हे, हे श्रेय माझा मित्र, ज्याने डोळ्यांची ऑपरेशन्स केली त्या डॉ. समीर रासकरचं आणि या ऑपरेशन्सचा खर्च करणा-या तुम्हां सर्वांचं.

आजपावेतो 300 भिक्षेक-यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन्स  पुर्ण झालेत.

मी ऋणी आहे!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*