अन्नपूर्णा उपक्रम… आढावा!

सप्रेम नमस्कार!

भीक न मागणाऱ्या परंतु रस्त्यावर निराधार अवस्थेत पडून असणाऱ्या गोरगरिबांना, ज्यांना अन्न मिळत नाही अशा लोकांना, रोजच्या रोज अन्न मिळावे यासाठी वैयक्तिक पातळीवर अन्नपूर्णा या नावाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे हे आपण जाणताच.

परंतु वैयक्तिक पातळीवर सुरू केलेला हा उपक्रम वैयक्तिक न राहता, तो समाजाचा कधी झाला हे आम्हालाही कळलं नाही.

डॉक्टर होऊन २१ वर्ष झाली म्हणून सुरुवात २१ डब्ब्यांनी करायची, असं सुरुवातीला ठरवलं होतं.  हे २१ डबे आपण रोज देऊ शकू ना? याविषयी मनात खोलवर कुठेतरी धाकधुक होतीच.

या उपक्रमासाठी तयारीला थोडा वेळ मिळावा म्हणून हा उपक्रम १ मे पासून सुरु करायचा असंही ठरवलं होतं. परंतु आपणा सर्वांना या उपक्रमाची माहिती समजली, आणि न मागताच मदतीचा ओघ सुरू झाला…

कुणी आर्थिक मदत देऊ केली, कुणी कमी पैशात डबे देण्याचं मान्य केलं, कुणी मोफत जेवण देवू केलं, ज्यांना ज्या पद्धतीने जमेल त्यांनी त्या त्या पद्धतीने मदत देऊ केली…

आणि यामुळे २१ गोरगरिबांना रोजच्या रोज आपण जेवण देऊ शकू की नाही, हा विचार करणारे आम्ही…  आपल्या सर्वांच्या मदतीमुळे सध्यातरी रोजच्या रोज १०० ते १५० पेक्षा अधिक गोरगरिबांना अन्न देण्यास आज सक्षम झालो आहोत.

हि पुण्याई आपली.!!!

आता १ मे ची वाट न पाहता हा उपक्रम आपण २९ एप्रिल पासूनच सुरू करीत आहोत.

आपणां सर्वांचे आम्ही ऋणी आहोत,  आपणांपुढे नतमस्तक आहोत!

सुरुवातीला रुग्णालयांमधील रुग्णांना जेवण देण्याचे आम्ही ठरवले होते, परंतु कोव्हिड काळात अनेक रुग्णालयांस अनेक संस्था आधीपासूनच अन्नदान करत आहेत हा विचार करुन म्हणून सध्याच्या कोव्हिड काळात पुलांखाली / फुटपाथवर निराधार आणि निराश्रित म्हणून जगणाऱ्या, लोकांना हे जेवण देणार आहोत. कोव्हिड  कालावधी संपल्यानंतर, रुग्णालयांमध्ये उपचार घेत असणा-या, आम्हास जमेल तितक्या गरीब लोकांना “आजन्म” अन्नदान  सुरू ठेवण्याचे आम्ही ठरवले आहे.

रस्त्यावर असणारी माणसं आज उपाशी आहेत याचा विचार करता करता, रस्त्यावरचे भटके प्राणी  सुद्धा उपाशीच असणार याची सुद्धा यानिमित्ताने जाणीव झाली. आणि म्हणूनच या उपक्रमांमधून माणसांबरोबरच गोमाता आणि रस्त्यावरील इतर भुकेले प्राणी यांच्याही अन्नाची सोय आम्ही करण्याचे ठरवले आहे.

आज जमिनीवर आहोत, उद्या जमिनीच्या आत असु… जमिनीवर असण्या आणि नसण्या मधील अंतर म्हणजे आयुष्य!
इतके दिवस जिवंत होतो, आता उरलेल्या आयुष्यात जगायला शिकत आहोत.!

आपणास पुनश्च अभिवादन!!!

भुकेला हाच देव, अन्नदान हीच पूजा…

 

Bank Details for Annapurna

Account Name: Manisha Institute of Yogic Science
Type                 : Current
Bank Name     : Canara Bank, Aundh Pune
Account No     : 5342 1010 0029 17
IFSC Code      : CNRB0015342

(B नंतर दोन शुन्य आहेत)

Paytm/Phone Pay: 8308315494

Kindly inform us, once you donate

आपण देणार असलेल्या देणगीला सध्यातरी टॅक्स ची सूट नाही याची कृपया नोंद घ्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*