रस्त्यावर तळागाळात काम करताना नुकतीच जन्मलेली एक पिढी दिसते नागडी आणि उघडी!
पुढच्या चौकात एक पिढी दिसते, आयुष्याच्या अंताला लागलेली, तीही नागडी आणि उघडीच!
यांचं बालपण जसं गेलं, तसंच म्हातारपण सुद्धा जाणार… जगलेलं आयुष्य सरून जाणार!
जगलेल्या आयुष्यात यांनी काय कमावलं असेल आणि किती गमावले असेल याची त्याची त्यांनाच कल्पना…
यांचंही आयुष्य कधी बदलेल?
खूपच पुण्ण्याचं काम करताय तुम्ही दोघे. मी सुनीता, वय 63 वर्षे,रिटायर्ड स्त्री. तुमच्या कार्यात काही खारीचा वाटा उचलायला आवडेल मला.