अन्नदान प्रकल्प सुरू केला आहे… पोरानं बाहेर काढलेल्या या आईला जेवण द्यायला गेलो.
ती उपाशी होती…
मला म्हणाली, “जेवलास का रे पोरा?”
मी म्हणालो, “आता घरी जाऊन जेवणारच आहे…”
“जेव की मग माझ्याबरोबर” असं म्हणत तीने हाताला धरुन, खाली बसवून, पहिला घास मलाच भरवला…
दुसरा घास मी तीला भरवला…
यानंतर गंमत झाली…
आभाळ भरुन आलं…
आणि पाऊस धो धो कोसळायला लागला…
तो तीच्या डोळ्यात होता आणि अंगणात सुद्धा!!!
इकडे मी बाळ म्हणून अमृताचे घोट प्यालो…
आणि तिकडे ती अमर झाली… आई म्हणून!!!
Leave a Reply