“जन” आणि “जनावर” दोघेही भिन्न…
तरी दोघेही एकच!
एक “निराधार” तर दुसरा “बेसहारा”…
दोघांनाही आधार देणारा फुटपाथ मात्र एकच!
एक “पशु” आहे दुसरा “व्यक्ती”…
पण प्राणी म्हणून दोघेही एकच!
याला “चार” पाय तर त्याला “दोन”…
पण दोघांनाही मारते ती एक भूकच!
“जन” आणि “जनावर” दोघेही भिन्न…
तरी दोघेही एकच!!
केश कर्तन करणारा हा कारागीर आहे… परिस्थितीच्या फेऱ्याने तो आज फुटपाथ वर आहे. याला शुचिर्भूत करून, एका निवारा केंद्रात सोमवारी १९ जुलै रोजी दाखल करत आहे. या निवारा केंद्रात तो परावलंबी म्हणून जगणार नाही. निवारा केंद्रात अगोदरच असलेल्या इतर लोकांची दाढी आणि कटिंग तो करेल. या बदल्यात त्याला सुरक्षित निवारा आणि सन्मानाने अन्न, वस्त्र मिळेल.
मुख्य म्हणजे “माणूस” म्हणून जगण्याची एक संधी मिळेल!!!
कागदपत्र आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता सुरू आहे, सविस्तर लिहिनच याच्याविषयी!
Leave a Reply