भीक नको बाई शिक

शैक्षणिक वर्ष हळूहळू का होईना, पण सुरू होत आहे.

चालू शैक्षणिक वर्षासाठी भिक्षेकरी समाजातील एकूण ५२ मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना आज पावेतो सर्व शैक्षणिक साहित्य प्राप्त करून दिले आहे. याच बरोबर त्यांच्या शाळा आणि कॉलेजच्या फिया सुद्धा भरून झाल्या आहेत. मुलांच्या पालकांनी हे साहित्य स्वीकारलं, डोळ्यात एकच भावना होती… आम्ही भीक मागितली पण आमची मुलं नाहीत भीक मागणार!

माझ्या या ५२ मुलांमधील माझी एक मुलगी, तीचं सीए व्हायचं स्वप्न आहे! तिला यावर्षी बीकॉम च्या दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेऊन दिला आहे.

नुकतीच अकरावीची परीक्षा पास झालेल्या मुलाला बारावी सायन्सला प्रवेश घेऊन दिला आहे.
मी सहज त्याला विचारलं, “बारावी सायन्स करून पुढे काय करशील?”
यावर तो आत्मविश्वासाने म्हणाला, “I will either go for B. Tech or I will become Doctor like you and serve the downtrodden people in society!”

त्याचं हे उत्तर ऐकून मला काय वाटलं असेल.. हे मी शब्दात नाही सांगू शकणार!

मनीषा, पोरं मोठी झाली बरं का!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*