एक मावशी… डोळ्याला दिसत नाही, पायाने अपंग!
फुटपाथवर ऊन पावसात संसार मांडला होता.
फुटपाथवर ती राहते, पाऊस सर्व संसार भिजवून जातो… आयुष्याचा चिखल करतो… त्याला त्याची तमा नसते!
आणि म्हणून मग पावसापासून संरक्षण करण्यासाठी, फुटपाथ वर ती राहते त्या ठिकाणी प्लास्टिकचे कापड अंथरून छप्पर तयार करून आधी निवारा मिळवुन दिला.
त्यानंतर च्या टप्प्यात तीला एक व्हीलचेअर घेऊन दिली. या व्हीलचेअरला ऑटोरिक्षा ला असतं तसं छप्पर तयार करून दिलं. व्हील चेअर च्या आत मध्ये वस्तू ठेवण्यासाठी आणि अडकवण्यासाठी वेगवेगळे कप्पे आणि हूक्स लावून दिले. परवा दिवशी सर्व विक्रीयोग्य साहित्य तीला घेऊन दिलं.
आता हे सर्व विक्री योग्य साहित्य व्हीलचेअर च्या आत मध्ये मांडणी करून रस्त्यावर ती या वस्तूंची विक्री करते. ती या व्हीलचेअर मध्ये बसून वेगवेगळ्या ठिकाणी या वस्तूंची विक्री करते आणि तीचे पती ही व्हीलचेअर ढकलतात…
चला बंद असलेलं एक आयुष्य ढकलत का होईना पण सुरू झालं…
एक भिक्षेकरी कष्टकरी झाली… गावकरी झाली!
Leave a Reply