भिक्षेकरी हा असा गट आहे, जो रस्त्यावर, फुटपाथवर / झोपडपट्टीत राहतो.
सतत हात धुणे, एकमेकात अंतर ठेवणे, मास्क लावणे या सर्व बाबी रस्त्यावर शक्य होतीलच असं नाही, तरीही मागील दोन वर्षांपासून त्यांचे सतत समुपदेशन सुरू आहे. मास्क, सॅनिटायझर आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या औषधी देणं सुरू आहे.
यातून भिक्षेक-यांना Corona पासून दूर ठेवण्यात ब-यापैकी यश आलं आहे.
खरंतर या गटाला मोफत आणि सर्वात आधी लस देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या गटाला सुरक्षित केलं नाही, तर हा गट इतर अनेक लोकांना बाधित करेल. परंतु, यांच्याकडे आधार कार्ड अथवा ओळखीचा कोणताही पुरावा नाही, तसेच मोबाईल अथवा तत्सम कोणतेही साधन नसल्यामुळे लसीकरणासाठी यांची नाव नोंदणीही करणे शक्य नाही.
या पार्श्वभूमीवर, भिक्षेक-यांच्या सर्वांगीण विकासाचा एक भाग म्हणून, रस्त्यावर याचना करणाऱ्या, तसेच निराधार लोकांना Covid पासून बचावासाठी सर्व भिक्षेक-यांची लसीकरण मोहीम आपण हाती घेत आहोत.
सूर्य हॉस्पीटल, शनिवारवाड्याजवळ, पुणे, या प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत आपण करार केला आहे. या अंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व भिक्षेक-यांना आपण मोफत लस देणार आहोत. त्यापैकी पहिल्या २५ जणांच्या गटाचे लसीकरण उद्या दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
प्रायव्हेट हॉस्पिटल मधील लसीकरणाचा संपूर्ण खर्च आदरणीय सौ. अनुश्रीताई भिडे, ज्येष्ठ समाजसेविका, ठाणे यांनी उचलला आहे. आम्ही आणि आमचा भिक्षेकरी गट या माईंचे ऋणी आहोत.
माहितीकरीता सविनय सादर!
Leave a Reply