२४ जानेवारी रोजी भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासाठी, पूर्वी भीक मागणाऱ्या यांच्यामधील कलाकारांनीच काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री हॉटेल ऑर्किड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं होतं.याच काळात श्री. त्रिपण बॅनर्जी, भारतातील एक नामवंत चित्रकार यांनी सुद्धा या प्रदर्शनात आपली चित्रे विक्रीसाठी आम्हाला देऊन भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासाठी हातभार लावला होता.
आता श्री. त्रिपण बॅनर्जी यांनी या चित्रांची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. चित्र विक्रीमधून जमा होणारा सर्व निधी ते सामाजिक संस्थांना दान देणार आहेत.
समाजाला मदत करण्याच्या या त्यांच्या अनोख्या उपक्रमाला माझं वंदन.
अधिक माहितीसाठी व चित्रांच्या खरेदीसाठी खाली लिंक देत आहे.
“Fine Art for Charity” mydukaan.io/fine329
Leave a Reply