रस्त्यावर पडलेलं कडकडीत ऊन…
या उन्हात भिक्षेकर्यांच्य गर्दीत बसलेला मी…
घामाने भिजलेला आणि घामाघूम झालेला…
भीक मागणाऱ्या माझ्या कुटुंबातील एक छोटीशी मुलगी येते… मला पाहते आणि शोधून एक छत्री घेऊन येते…
नको-नको म्हणत असतानाही तब्बल दोन तास डोक्यावर छत्री धरून उभी राहते…
वयाने मी तिच्या पेक्षा मोठा म्हणून मी तिला माझी मुलगी समजतो…
मधून मधून मी तिच्याकडे पाहत होतो, तिच्या डोळ्यात मला दिसत होती फक्त माया, ममता आणि वात्सल्य! ती सुद्धा माझ्याकडे पाहत होती, एखादी आई आपल्या बाळाकडे पाहते तशी! पोराच्या अंगावर आईने पदर धरावा, तशी तिने छत्री माझ्या डोक्यावर धरली होती…
वयाची सारी बंधने पार ओलांडून तीच आज माझी आई झाली होती!
प्रत्येक “बाई” हि प्रथम “आई” असते…
वय – बीय सारं झूठ!!!
Leave a Reply