Crossed १००० Eye operations!
नाईलाजाने भीक मागणाऱ्या लोकांमध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत. वयोमानानुसार त्यांना दिसत नाही. कोणाला चष्मा लागला आहे, कुणाला अंधत्व आलं आहे, तर कुणाला मोतीबिंदू झाला आहे.
अशा लोकांना रात्रीच्या वेळी रस्ता क्रॉस करताना अपघात होतात, या अपघातात अपंगत्व येते किंवा मृत्यू होतो.
आपल्याला हे अपघात कसे टाळता येतील, या विचारातून आम्ही भीक मागणाऱ्या या ज्येष्ठ समाजाची नेत्रतपासणी सुरू केली. त्यांना चष्मा द्यायला सुरुवात केली, ज्यांना मोतीबिंदू झाला आहे अशांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्याची सुरुवात केली.
आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आज ३१ ऑगस्ट २०२१ अखेर आम्ही १००० लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घेण्याचा टप्पा ओलांडला आहे!
हे सर्व घडलं आपल्या साथीने… आपणा सर्वांना साष्टांग नमस्कार!
Leave a Reply