एक भीक मागणारी अपंग व्यक्ती!
याला दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरच झाडू, खराटा, फिनेल, साबण अशा वस्तू विकण्याचा व्यवसाय टाकून दिला होता. (पूर्वी तो हाच व्यवसाय करत होता) हळूहळू धंद्यात जम बसत गेला.
४ ऑगस्ट रोजी याचा मला फोन आला. म्हणाला, “सर मी माज्या पैशातून, अपंगांसाठी असते ती तीन चाकी स्कुटी विकत घेतली हाय… तुमि या ना… तुमच्या हातनं गाडीला हार घालायचा हाय… आपण एकदा गाडीवर चक्कर मारू!”
तीन वर्षांपूर्वी माझं हे पोरगं पाटाला चाक लावून घसरत घसरत रस्त्यावर भीक मागायचं…
बाप अजून पण टू व्हीलर चालवतय, आज पोरांन स्वतःच्या कष्टातून थ्री व्हीलर घेतली…
बाप से बेटा सवाई निकला…
कोणत्या बापाला आनंद होणार नाही.?
Leave a Reply