अलव्य
बोटातली अंगठी हरवल्यामुळे सकाळपासून होत असलेली चिडचिड… कशातही लक्ष नाही…
लक्ष सारखं त्या अंगठी नसलेल्या बोटाकडं!
अशात रस्त्यावर “ती” दिसली… वेडसर वाटली… अत्यंत ओंगळवाणा अवतार…
मास्क देत जरा डाफरूनच म्हणालो, “मास्क लाव तोंडाला!”
मंद हसत, माझ्याकडे बघत, तीने मान वळवत, कानाकडची बाजू दाखवली…
हातात सुंदर मास्क होता, परंतु तो अडकवण्यासाठी तिला कानच नव्हता, आणि बोटंही!
माझ्या डोळ्यात पाणी आलं…
अंगठी नसलेल्या माझ्या बोटाकडे, मी कृतज्ञतेने पाहिलं, आणि मग माझ्याच बोटापुढे मी नतमस्तक झालो!
Leave a Reply