पूर्वी याचना करणारा माझा एक याचक बंधू!
याला तीन वर्षांपूर्वी चर्मकारीचा व्यवसाय टाकून दिला…
फाटक्या चपलीला टाके घालता घालता, फाटलेल्या आयुष्याला सुद्धा आपोआप टाके बसत गेले…
हळूहळू स्थिरस्थावर होत आहे.
मागच्या महिन्यात पावसात भिजत थंडीमध्ये कुडकुडत हा काम करत होता…
मला याच्या जिद्दीचे कौतुक वाटलं आणि वाईट सुद्धा!
मागच्या आठवड्यामध्ये याला एक नवीन हात गाडी घेऊन दिली आहे, आता तो या हातगाडीत बसून काम करतो.
गाडी ताब्यात घेताना मला म्हणाला, “नमस्कार वो सर तुमाला”
मी म्हटलं, “वेड्या… ही गाडी मी तुला दिली नाही… तर ही गाडी समाजाने तुला दिली आहे… चल, आपण दोघे ही समाजाला नमस्कार करू”
Leave a Reply