बस च्या प्रतीक्षेत आम्ही दोघेही लाईन मध्ये… मागून तो म्हणाला, “ऐक ना हल्ली जगावं असंच वाटत नाही, आत्महत्या करावीशी वाटते…” तो बरंच काही बोलत होता. चेहरा ओढल्या गत दिसत होता.
बस आली, बस मध्ये घुसता घुसता त्याला म्हणालो, “अरे चल रे… नोट चुरगळली म्हणून आपण तीला काही फाडून फेकून देत नाही… चल पटकन बसमध्ये!”
कसं नुसा हसत म्हणाला, “ नको अरे… आताशा प्रवास करण्याची हिंमत संपली… मला जीथे पोचायचं आहे तिथं मी पोचलोय आता!”
एवढ्यात फोन वाजला. पलीकडून “ती” रडत म्हणाली “हे” गेले… “ह्यांनी” गळफास लावून आत्महत्या केली!
“अगं काय सांगतेस? आत्ता तो माझ्या सोबत आहे इथे”, मी किंचाळत म्हणालो.
तो ज्या जागी मघाशी उभा होता, त्या जागी खिडकीतून मी नजर टाकली… तो तिथे नव्हता… कुठेही नव्हता!
Leave a Reply