अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून, हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या योजना अंतर्गत जे गरीब रुग्ण उपचार घेत आहेत आणि ज्यांना जेवणाचा डबा आणून देणारे कुणीही नातेवाईक नाहीत अशा गरीब रुग्णांना अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रोज जेवणाचे डबे देत आहोत.
सध्याच्या पंधरवड्यात आपल्या पूर्वजांना आठवून त्यांचे नामस्मरण केले जात आहे… त्यांचे ऋण मानले जात आहे! याच धर्तीवर, आपले पूर्वज समोर आहेत असेच समजून, हे अन्नदान सुरू आहे!
डबे देत असताना, या उपचार घेत असणाऱ्या आजी आजोबांकडून कडून खूप आशीर्वाद मिळतात आणि आत्मिक समाधान सुद्धा! यापैकी आत्मिक समाधान आमच्या जवळ ठेवून, मिळालेले सर्व आशीर्वाद समाजाच्या पायाशी अर्पण करत आहोत… कारण हा त्यांनीच चालवलेला उपक्रम आहे!
नतमस्तक!!!
Leave a Reply