आपल्या आशिर्वाद शुभेच्छा आणि "मदतीने" गोळ्या औषधं देता देता तीन लोकांनी आजपासुन भीक मागणं पुर्णत: सोडलंय!
त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी फोटोतली ओळख लपवली आहे मुद्दाम...
आजीला मंदिराबाहेर फुलाचा व्यवसाय घालुन दिलाय!
फुलं घेतली तीने आणि व्यवसाय सुरु केला तीने...
हात माझे सुगंधी झाले!
एका अपंग व्यक्तीला आधी चालण्याची काठी देवुन शारीरिक रित्या उभं केलं!
रुमाल आणि स्कार्फ घेवुन विकायला लावले...
आर्थिक रीत्याही ताठपणे उभाच राहिलं, प्रयत्न तरी तोच आहे....
एका आजोबाला वजनकाटा दिला. पहिल्या दिवसापासुन सुरुवात मस्त झाली!
एका तासात त्यांनी 80 रुपये कमावले... वजनकाट्याने त्यांचा खिसा जड केला,
आणि माझ्या मनावरचा भार हलका!
या सर्वाचं श्रेय आपलं आहे. आपल्या प्रेम आणि कौतुकामुळे मी हे करतोय...
या लोकांनी दिलेल्या आशिर्वादाचे खरे धनी आपण आहात, कारण मदत आपण करता आहात!
मी फक्त योग्य त्या ठिकाणी मदत पोचवतोय एका कर्तव्य दक्ष पोस्टमनसारखं...
Leave a Reply