ब-याच दिवसांपासुन यांच्याबरोबर चर्चा सुरु होती, आज फळाला आली...
एका धट्टया कट्टया माणसाला काम करण्याविषयी विनवत होतो.
शेवटी, एका बांधकाम व्यावसायिकांकडे बिगारी कामाकरीता जॉईन झाला!
एका सधन मॅडमनी या आजीला घरकाम दिले आहे,
शिवाय त्यांची राहण्याची सोयही...
तिसरे आजोबा, बॅटरी विकायचे पुर्वी!
धंद्यात आलेली खोट आणि परिस्थिती यामुळे इथे आहेत आत्ता!
एक संधी दिलीत तर पुन्हा उठुन उभा राहीन म्हणतात...
स्वतःची त्यांची एव्हढी इच्छा आहे तर, नक्कीच यशस्वी होतील!
मी फक्त हात देणार एकदा , नंतर ते सावरतीलच...
चतुःशृंगी यात्रेमध्ये पुन्हा व्यवसाय सुरु होत आहे!
ज्यांनी अप्रत्यक्षपणे मदत केली त्या सर्वांचे आभार…
Leave a Reply