आपल्या प्रेमाचं माणुस आपल्याला भेटुन निघालं की त्याला पाठमोरं जाताना वाईट वाटतं कि आनंद होतो?
नक्कीच वाईट वाटतं! एका बाबांना व्यवसायाला लागणारं सामान घेवुन दिलं...

ते स्वाभिमानी बाबा ताडकन् उठले, भिक मागायच्या जागेला एकदा नमस्कार केला, माझा हात हातात घेवुन पाणावलेल्या डोळ्यांनी माझा निरोप घेत म्हणाले,
"येवु डॉक्टर? येतो मी आता"
म्हटलं, "बाबा, आपल्यात कुणी असं म्हणत नाही कुणाला, पण मी म्हणतो, “येतो” म्हणु नका “जातो” म्हणा .... खरंच इथे नका येवु परत! कायमचे जा - इथुन!”
डोळ्यातुन घळाघळा अश्रू आणि चेह-यावर हसु...
उन्हात पडणारा पाउस लाखवेळा पाहिलाय, पण आजचा हा "श्रावण" वेगळाच होता....!!!
ते निघाले माझा निरोप घेवुन, दुर जाणाऱ्या पाठमो-या व्यक्तीकडे पाहुन मनापासुन आनंदी होण्याची माझी ही पहिलीच वेळ! जाताना शेवटच्या वळणावर ते क्षणभर थांबले, त्यांनी मागे पाहिलं पुन्हा, मी तिथंच होतो अजुन... जाताना टाटा साठी त्यांनी हात हलवला, मी ही उलटा प्रतिसाद दिला...
मी थांबलो तरीही, हात हलवणं त्यांचं थांबेना!
माझी खात्री आहे, हा टाटा, बाय बाय माझ्यासाठी नव्हताच, तो होता त्या लाचारीसाठी, जीला लाथाडुन ते आता स्वाभिमानाच्या गावाला निघाले होते!
Leave a Reply