ब्लडप्रेशर या त्रासाविषयी आपणां सर्वांनाच माहिती असते, पण भिक्षेक-यांना? त्यांना याविषयी काही माहिती नसते, आणि असुन तरी काय फायदा? अशी अवस्था आहे!
ब्लडप्रेशर चा त्रास आहे हे सुरुवातीला कळत नाही, कळतं त्यावेळेला काही उपयोग नसतो, गुपचुप सहन करण्यावाचुन आणि गोळ्या खाण्यावाचुन पर्याय नसतो…
भिक्षेक-यांवर ही वेळ येवु नये यासाठी हा सारा खटाटोप!
म्हणुन सर्व भिक्षेक-यांचं ब्लडप्रेशर चेकअप दि. 7 ऑक्टोबर पासुन सुरु करीत आहोत.
मागील रक्ततपासणी वेळी जे अडथळे आले त्यातुन धडे घेवुन; 1 तारखेपासुनच भिक्षेक-यांचं प्रबोधन करायला सुरुवात केली आहे; त्यांना कळेल अशा शब्दांत…
ब्लडप्रेशर म्हणजे काय, त्रास काय होतात, काय काळजी घ्यावी, तपासणी म्हणजे नेमकं काय करणार, वगैरे वगैरे… जेणेकरुन प्रकल्पावेळी गैरसमजातुन अडचणी येवु नयेत…
मी लायन्स क्लब ऑफ पुणे पर्ल, पुणे या आंतरराष्ट्रीय संस्थेचा सभासद आहे… 7 तारखेचा शुभारंभ या संस्थेच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत करीत आहे.
स्थळ: नवग्रह मंदिर, शनीवारवाड्याजवळ, सकाळी 10.30 ते दुपारी 1 पर्यंत…
नेहमीप्रमाणेच रस्त्यावर उतरुन मदत करायला माझी पत्नी डॉ. मनिषा अभिजीत सोनवणे, संस्थापक अध्यक्ष, सोहम ट्रस्ट – डॉक्टर फॉर बेगर्स हिची सोबत आहेच..!
ब्लडप्रेशरचा त्रास निष्पन्न झाल्यास, त्यावर योग्य ती ट्रीटमेंट आणि न निघाल्यास टाळण्याचे उपाय सांगणं हे ओघाने आलंच…. या सर्व संवादातुन त्यांना भीक मागणं सोडुन देवुन काम करायला प्रवृत्त करणं हे ही आपोआप आलंच की!!!
Leave a Reply