आढावा – नजर

 • शनीवार दि. 4 नोव्हेंबर 2017, आज सकाळी 8.30 पासुन नेहमीच्या औषधतपासणीसह भिक्षेकरी नेत्र रुग्णांची नोंदणी करायला सुरुवात केली.
 • आज दिवसभरात वेगवेगळ्या भागातील एकुण 24 रुग्ण असे शोधले आहेत की त्यांना डोळ्याचा काही न काही आजार आहे, आणि या आजारावर उपचार करुन घेण्यास ते पुर्णतः असमर्थ आहेत.
 • या 24 रुग्णांपैकी काही औषधाने बरे होतील, काहींना चष्मा लागेल किंवा काहींना ऑपरेशन लागेल.
 • या सर्वांची नेत्र तपासणी, पुण्यातील सुप्रसिद्ध नेत्र तपासणी तज्ज्ञ डॉ. वैभवी रावल, MD Ophthalmology, या करणार असुन गरजु रुग्णांचे ऑपरेशन अत्यंत नगण्य अशा फी मध्ये करुन देणार आहेत. त्यांचे मनापासुन आभार!
 • पुण्यातील जास्तीत जास्त भिक्षेक-यांना हा लाभ मिळवुन देणे हे एक अथवा दोन दिवसाचे काम नव्हे, कारण ऑपरेशन पुर्वी आणि नंतर एका भिक्षेक-यास किमान तीनवेळा दवाखान्यात घेवुन जाणे आवश्यक आहे. म्हणुन इथुन पुढचे काही महिने या सर्व प्रक्रियेला लागणार आहेत.
 • आज नोंदणी केलेल्या सर्व पेशंट्सची प्राथमिक तपासणी मंगळवारी 7 तारखेस करवुन घेणार आहोत. या दिवशी नेत्रतपासणी व लागणा-या सर्व रक्ततपासण्या केल्या जातील.
 • खाजगी वाहनातुन घेवुन जाण्याची आणि पुन्हा त्यांच्या मुक्कामी सोडण्याची व्यवस्था केली आहे. (अर्थात मी सोबत असणारच आहे)

बघुया, तुमच्या साथीने सुरुवात केली आहे, काम थोडं अवघड आहे नक्कीच, पण तुमच्या मदतीमुळे आता खुप सोप्पं झालंय…

मी मनापासुन ऋणी आहे आपला, कारण आपल्यापैकी प्रत्येकाने मला शारीरिक, आर्थिक आणि मानसीक मदत केली आहे. तुमच्याच खांद्यावर मी उभा आहे, याची मला सतत आठवण आहे!

श्री. व सौ. भुवड हे ज्येष्ठ दांपत्य, प्रविण लोखंडे हा UPSC च्या अभ्यासातुन वेळ काढणारा बंधु समान मित्र आणि IT क्षेत्रात काम करणा-या भगीनी सौ. कविता देशपांडे, उन्हातान्हात दिवसभर फिरुन निःस्वार्थपणे मला मदत करत होते…

इतकं काही लिहितो मी, पण आज यांच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत!!!

आपल्या माहितीसाठी सविनय सादर..!

 

1 Comment

 1. Hats off to your team,great job your team doing.
  Be always blessed. Sometimes I would like to join your team financially though not physically say
  ..KHARICHA WATA

Leave a Reply

Your email address will not be published.


*