२३ नोव्हेंबर
- आज शेवटी 12 जणांचे मोतिबिंदुचे ऑपरेशन्स झाले.
- संपुर्ण हायटेक मशीन्सच्या सहाय्याने महागड्या लेन्सेस बसविल्या आहेत.
- उद्यापासुन स्वच्छ नजरेने त्यांना पाहता येईल याचा आनंद त्यांच्यापेक्षा मलाच जास्त झालाय.
- संपुर्ण हॉस्पिटल स्टाफने स्वतःच्या घरच्यांप्रमाणे या आजीआजोबांची काळजी घेतली… हे पाहुन माझंही मन भरुन आलं….
- उद्या सर्वांना पुन्हा तपासणीसाठी घेवुन जाणे गरजेचे आहे…. जाणार आहोत!
- रॉबीनहुड संस्था, भुवड दांपत्य, पवन, भातंबरेकर बाबा, हॉस्पिटल स्टाफ यांचे मनापासुन आभार
- डॉ. वैभवी रावळ मॅडम, डॉ. जपे मॅडम यांचे विशेष आभार.
आपल्या मदतीशिवाय हे शक्य नसतंच झालं… आपणांस वंदन…!
निष्प्राण डोळ्यांचे मोती होतील उद्या, केवळ आपल्यामुळे…!!!
जास्त काही लिहित नाही, आज तेव्हढं त्राण ही नाही उरलं… सोबत पाठवलेल्या फोटोंनाच बोलु दे आज…. !!!
इतकंच सांगतो की मला आणि मनिषाला आयुष्यभर पुरतील इतके आशिर्वाद मिळाले…
यांचंही श्रेय आम्ही आपणांस देवु इच्छितो… कृपया स्विकार व्हावा…
Leave a Reply