आपल्या आशिर्वाद, शुभेच्छा आणि मदतीमुळेच उद्या गुरुवारी 4 तारखेला आणखी 12 भिक्षेकरी आजीआजोबांचे लेले हॉस्पिटल, शनीवारवाड्या जवळ, पुणे येथे डोळ्यांचे ऑपरेशन करुन घेणार आहोत आपण.
10:30 ते 4:00 वाजेपर्यंत आम्ही इथेच असु.
हे सगळं शक्य होतंय केवळ आपल्या आशिर्वादामुळे… मी फक्त माध्यम आहे, सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने जुळवुन आणुन त्यांची व्यवस्थित सांगड घालणं इतकाच माझा सहभाग…
आणि या लोकांना दिसायला लागल्यावर ते कुठलीही सबब न सांगता , काही काम करतील एव्हढीच माझी माफक अपेक्षा!
10-20 रुपये “भिक” देवुन, त्याला लाचारीची सवय लावुन, त्यांना कायम भिकारीच ठेवण्यापेक्षा, एखाद्याला “दृष्टीदान” देवुन त्याला आणि पर्यायाने त्याच्या कुटुंबाला स्वावलंबी बनवणं हे माझ्या मते डोळस दान आहे…
या माझ्या विचारांशी सहमत होवुन आपण मला हरत-हेने प्रोत्साहन देताय, आपणांसही माझा मानाचा मुजरा…!
सध्याच्या जाळपोळीच्या वातावरणात उद्याची ऑपरेशन्स रद्द करा असं खुप जणांनी मायेनं सांगितलंय मला, पण… ज्यांना इतके दिवस आईबाप – देव मानत आलोय, त्यांच्या सेवेसाठी चाललो असतांना आणि खुद्द ते बरोबर असतांना मला कोणाची कसली भिती?
खरंतर, आम्हाला कसलीही जात नाही, कोणताही धर्म नाही, आम्ही जोडले गेलोय माणुसकीच्या धाग्याने…!
जाळपोळीत माणुस मरेल पण माणुसकी नाही!!!
Leave a Reply