काव्यमित्र या संघटनेच्या वतीने सामाजीक क्षेत्रात काम करणा-या अनेकांना मानाचा पुरस्कार दिला जातो.
“राष्ट्रीय आदर्श समाजभुषण” या नावाने मलाही उद्या (6 जानेवारी 2018) एक पुरस्कार जाहिर झालाय !
मी संयोजकांना विनंती केल्येय की, मला पुरस्कार देण्याएव्हढं मी, जगावेगळं काही केलं नाही, माणुस आहे, माणसासारखं वागलो; यांत काय कवतीक?
“त्यापेक्षा त्यांचा सत्कार करा, ज्यांनी आयुष्यभर फुकट खायची / लाचार व्हायची लागलेली सवय सोडुन कष्ट करुन खायची तयारी दाखवली आहे!”
Beggar to Entrepreneur किंवा भिक्षेकरी ते कष्टकरी या माझ्या कल्पनेला खुद्द भिक्षेक-यांनीच उचलुन धरलंय, यापेक्षा कोणता पुरस्कार माझ्यासाठी मोठा आहे!!!
या सर्व पार्श्वभुमीवर संयोजकांनी माझ्या विनंतीला मान देवुन, काम करायला तयार असणा-या एका अपंग आजीचा आणि एका आजोबांचा व्यासपीठावर माझ्याऐवजी सत्कार करायचे ठरवले आहे…
हा कार्यक्रम उद्या, 6 जानेवारी या दिवशी, सकाळी 10:30 ते 01:00 या वेळेत साने गुरुजी स्मारक, दांडेकर पुल बस स्टॉपजवळ, पुणे येथे आयोजीत केला आहे….*
आपल्या नातवाचा सत्कार समारंभ पहायला सगळेच आजीआजोबा जातात, आता आजीआजोबांचा सत्कार पहायला मी जाणार आहे, त्यांचा नातु म्हणुन… तुम्हीही आलात तर दुधात साखरच पडेल…
माझ्या विनंतीला मान देणारे, प्रमुख संयोजक, माझे बंधुसमान मित्र, राजसाहेब सगर यांचे अभिनंदन!!!
या एका सत्कारामुळे, काम करणा-याला मान मिळतो, हा मेसेज भिक्षेकरी समाजात जाईल, यातुन आणखी काही भिक्षेक-यांना काम करण्याची प्रेरणा मिळेल इतक्याच साध्या अपेक्षेने मी हा निर्णय घेतलाय… बघु…!!!
What can we do bhikari at shanipar ? And good luck hotel f c toad signal ?