कुणी काम देता का काम…?

  • एक इलेक्ट्रिशिअन / वायरमन काम करणारी व्यक्ती आहे.
  • छोटा टेंपो चालवु शकणारी व्यक्ती आहे.
  • फॅब्रीकेशन / वेल्डींग वर्क करणारी एक व्यक्ती आहे.
  • 24 तास घरी राहुन मुल सांभाळायला / आजारी रुग्णाची सेवा करायला / आजी आजोबांची शुश्रुषा करायला तयार असणारी एक तरुण महिला.
  • घरकाम करायला तयार असणारी आजी.

वरील कुणीही व्यक्ती स्वत: भीक मागत नाहीत, परंतु स्किल असुनही यांना काम मिळत नाही, म्हणुन ते त्यांच्या घरातल्या आई / वडील / सासु / सासरे यांना केवळ घर चालवण्यासाठी भीक मागायला पाठवतात

हे खुप वेदनादायी आहे!!!

आपण यांना काम देवु शकलो तर कदाचीत हे लोक आपल्या घरातल्या लोकांना भीक मागायला पाठवणार नाहीत…

प्रत्येकवेळी भिक्षेक-यांनाच काम दिलं पाहीजे असं काही नाही. त्यांना भीक मागायला लावणा-या त्यांच्या घरातल्या धडधाकट लोकांना काम दिलं तरीही, हे लोक आपल्या घरातल्यांना भीक मागु देणार नाहीत, आणि त्यामुळे बरेचसे भिक्षेकरी कमी होतील असं मला वाटतं…

बघु, असा थोडा उलटा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे..?

तेव्हा, वरिलपैकी काही काम असेल पुण्यात तर मला द्या… मलाच गरज आहे असं समजुन… प्लिज… प्लीज…

काम द्या मला भीक नको !!!

2 Comments

  1. खूपदा असं काम करणारी माणसे हवी असतात, पण विश्वासू व्यक्ती मिळत नाही. पुढच्या वेळेस कोणी विचारलं की पहिले तुमच्याशी संपर्क करू.

Leave a Reply

Your email address will not be published.


*