बरोब्बर मागचा सोमवार, 8 डिसेंबर – – येरवड्यातले शंकराचे मंदिर – – उत्साहानं भिक मागणारे पन्नास एक जण – – आणि एका कोपऱ्यात मलुल होवुन पडलेले एक बाबा – – कशाचीही शुद्ध नाही – – बोलायचं त्राण नाही – – काय होतंय विचारायचा प्रश्नच नव्हता – – श्वास चालु पण घशातुन घरघर चालु – – अगदी शेवटच्या क्षणाची असते तशीच – – चेहरा पांढराफटक चुन्यासारखा – – एकुण तपासता लक्षात आलं, हिमोग्लोबीन अत्यंत कमी आहे – – 3 किंवा 3.5 असावं (जे साधारण 10 पेक्षा जास्त असणे अपेक्षित असतं…) – – एवढ्या कमी प्रमाणावर त्वरीत ट्रिटमेंट न घेतल्यास मृत्यु अटळ – – काय करावं कळेना – –
माझं या बाबांकडे लक्ष आणि बाकीच्यांची झुंबड… “मला गोळ्या द्या आधी…” “आधी मला औषधं…”
बाबांना न्यावं रिक्षात घालुन आधी? की इतर पन्नास लोक आधी तपासावे? औषधं न देता इतरांनी मला जावुच दिलं नसतं, आणि बाबांना त्वरीत हलवणं तर गरजेचं…
शेवटी सर्वांना हात जोडुन सांगितलं… बाबांना हॉस्पिटलला सोडुन परत इकडे येण्याचं वचन दिलं… आणि बाबांना रिक्षात घालुन आणलं हॉस्पिटलला…
तिथल्या डॉक्टरांनी विचारलं, “गेले समजा मध्येच तर? Responsibility घ्याल ना डॉक्टर? पोलीसांत सांगुन बॉडीची विल्हेवाट लावावी लागेल? चालेल ना?”
एका क्षणापुर्वी आपलं असणारं, आपलं सुंदर शरीर दुस-या क्षणाला “बॉडी” असतं फक्त… क्षणात संदर्भ बदलतात…
शरीरापासुन — बॉडी पर्यंतचा प्रवास म्हणजेच आयुष्य असतं का..?
डॉक्टर्सना हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हताच..! आणि ट्रिटमेंट न घेण्यात काय शहाणपणा होता? जीवन मरणाच्या रेषेवर एक पाय आत आणि एक बाहेर अशी अवस्था होती त्यांची..!
येणारी वेळ ठरवणार होती… त्यांनी इकडे थांबायचं की पुढच्या प्रवासाला निघायचं… जीथं परतीच्या वाटाच नसतात…
शेवटी ऍडमिट करुन पुर्ण प्रयत्न करण्याची डॉक्टरांना विनंती केली – – तिथुन पुढे सोमवार ते शुक्रवार 2-3 वेळा बघुन आलो – – 6 बाटल्या रक्त चढवलं – – पण डॉक्टर्सना अजुन ठाम खात्री नव्हती, ते आपल्यात राहतील म्हणुन…
शनीवार – रविवार दोन दिवस मुंबईला जायचंय – – जावं की नको? – – गेलो आणि मागे काही झालं तर? जाणं ही तितकंच महत्वाचं…
मुंबईहुन दोन दिवस सतत डॉक्टरांशी संपर्क साधत होतो.
परिस्थितीत खुप सुधारणा आहे असं कळत होतं – – माझं मुंबईचं काम ही ठिक झालं… हजारो लोकांचे आशिर्वाद घेतले आणि रविवारी रात्री पुणं गाठलं…
आजचा सोमवार उजाडला – – धावत पुन्हा सक्काळी लवकर हॉस्पिटल गाठलं – – बाबा व्हरांड्यात फे-या मारताना दिसले – – माझा विश्वासच बसेना… मी त्यांना पाहुन मिठी मारली आणि म्हटलं, “शेवटी मीच जिंकलो… थांबलात तुम्ही आमच्यात..!”
बाबांना काही संदर्भ लागला नसावा माझ्या वाक्यांचा, आणि मला अपेक्षितही नव्हता…
शरीर म्हणायचं की बॉडी…? माणुस म्हणायचं की प्रेत? इतक्या धुसर सीमारेषेवरुन डिस्चार्ज घेवुन बाबांना घेवुन परत आलो आज “माणुस” म्हणुनच..!
बाबांना सर्व नातेवाईक आहेत पुण्यात, पण कोणालाही ते नको आहेत…
कालच मी एके ठिकाणी बोललो, “रस्त्यावरची गाढवं आणि कुत्रीसुद्धा एकमेकांना प्रेमानं चाटतात, जनावरं असुन..!”
“आपण माणसं असुनही, साधा हात हातात घ्यायला तयार नसतो आपल्याच जीर्ण झालेल्या माणसांचा..!”
जीर्ण झालेलं कापडसुद्धा लोकं फेकुन देत नाहीत, फरशी पुसायला का असेना वापरतीलच… मग जीर्ण झालेल्या माणसांना असं का रस्त्यावर टाकतात; सडायला आणि कुजायला कळत नाही..!
असो, या बाबांची आता एका साता-यातील माझ्या मित्राच्या अनाथाश्रमात सोय करणार आहे येत्या काही दिवसात…
जाताना बाबा माझा हात हातात घेवुन म्हणाले, “खुप उपकार झाले डॉक्टर…”
मी म्हटलं, “बाबा उपकार त्यांचे माना, ज्यांनी तुमची रिस्क घेवुन ट्रिटमेंट केली… उपकार त्या साता-यातील माझ्या मित्राचे माना, जो आयुष्यभर तुम्हाला मोफत सांभाळणार आहे… उपकार त्यांचे माना जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या पाठबळ देतात मला हे काम करण्यासाठी…”
“मी फक्त वायरमन… एका तारेला दुसरी तार जोडणारा… शॉर्टसर्किट होवु द्यायचं नाही… बस्स एव्हढीच काळजी घ्यायची..!!!”
यावर बाबा डोळ्यातलं पाणी लपवत गालातच हसले…
हसु आणि आसुंचं हे माझं बक्षीस मी जपुन ठेवेन माझ्या हृदयातल्या शोकेस मध्ये..!!!
Hello, tumchya saglya post vachalya, khup bharun ala Mann tumchya sarkhe mansa ahet jagat hey pahun.
Mi pan khup mahine zale tharvala ahe garju lokana Jamel tashi madat karaychi aarthik ani sharirik kasht hi karayla tayar ahe.
Mazya mulichya 1st birthday nimmit punyat eka anathashramat kirana saman deu kela parantu tithe loka bolale amhala paise pahijet khup waet vatla ki apan madat deu keli ani ashe uddhat loka astat tyana garajach nahi.
Mala kharach garjuna madat karaychi ahe. Tumchya sansthe madhe join hou shakte ka mi, mi dar ravivar vel deu shakte.
अतिसुन्दर,All the best Doctor
All the best. Don’t leave hopes an keep up ur efforts. All ur dreams will be tre very soon. God Bless! Have Trust. Not on others but the work u r doing genuinely.