आज रॉबिनहुड टीम चे सुनील पवार सर, भुवड दांपत्य आणि पवन यांच्या सहकार्याने १७ भिक्षेकरी आजी आजोबांच्या डोळ्यांची तपासणी केली.
या सर्वांचे ऑपरेशन १८ जानेवारी रोजी ठरले आहे.
अशा प्रकारची ऑपरेशन्स करणे किंवा वैद्यकीय मदत देण्यामागे हेतु एकच कि काम करा म्हणुन त्यांना सांगितल्यावर, “दिसतच नाही”, “पायच दुखतात”, “अपंग आहे, काय करु”, “हात आणि पाय पण नाहित” अशी कोणतीही कारणं त्यांनी सांगु नयेत…
या सर्वाचा परिणाम अगदी हळुहळु होतोय, पण निश्चित होतोय, हे खरं आहे…
एका भिक्षेकरी आजोबांना आपल्या पत्नीचे डोळ्याचे ऑपरेशन करुन घ्यायचं होतं, पण खर्च आवाक्याबाहेरचा…
मागच्यावेळी त्यांना सांगितलं होतं कि, “बाबा, तुमच्या पत्नीच्या सर्व तपासण्या आणि ऑपरेशन करुन देतो… पण तुम्ही काम करायचं!” ते त्याला तयार झाले… त्यांना वजनकाटा दिला…
आज पाहिलं, ते खरंच एका जागेवर काटा घेवुन बसले होते, भिक न मागता… त्यांनी त्यांचा शब्द पाळला…
आजीच्या सर्व तपासण्या आणि ऑपरेशन १८ तारखेला करुन मी ही माझा शब्द पाळेन..!
All the best. Good efforts. Keep it up. Don’t lose hopes. At the end of the day success is yours. Have patience an have trust in yourself, u will surely see all ur dreams come true, with ur hard work. God Bless !