माझे एक मित्र आहेत श्री. विजय शिंदे…. खुप दिवसांपुर्वी फोनवर बोलतांना म्हणाले, “डॉक्टर, महाबळेश्वरला खुप मोठं हॉटेल सुरु केलंय, शिवाय त्याहुन पॉश एक रिसोर्ट देखील सुरु केलंय… या की एकदा फॅमिलीला घेवुन, सर्व एकदम मस्त व्यवस्था करतो…”
आणखीही खुप बोललो आम्ही, पण एक वाक्य मनावर ठसलं – “या की एकदा फॅमिलीला घेवुन, सर्व एकदम मस्त व्यवस्था करतो…”
हे वाक्य माझा पिच्छा सोडेना… विजय सरांना कसं सांगु? माझी रस्त्यावरची फॅमिली किती मोठी आहे…
सतत विचार करुन मला एक आयडीया सुचली…
विजय सरांना पुन्हा फोन लावला, “सर, तुम्ही म्हणाला होतात मला, महाबळेश्वरला फॅमिलीची व्यवस्था करतो म्हणुन…”
“बेशक डॉक्टर साहेब, या ना तुम्ही… आमचा पाहुणचार तर घेवुन बघा…”
“सर, मी कोणासाठी काय काम करतो हे तुम्ही जाणता?”
“हो, डॉक्टर मला माहित आहे…”
“सर, मग हिच माझी फॅमिली आहे रस्त्यावरची… यांची व्यवस्था कराल सर्वांची, तुमच्या हॉटेल आणि रिसोर्ट मध्ये?” माझा रोख, विजय सरांच्या लक्षात आला नसावा..!
मी म्हटलं, “सर… तुमचा एव्हढा मोठा व्याप आहे… तुम्हाला खुप स्टाफ लागत असेल ना? माझ्या या फॅमिलीतल्या दोन – चार माणसांना काही छोटं मोठं काम द्याल तुमच्या हॉटेलींग बिझनेसमध्ये? ख-या अर्थानं सर यांच्या कुटुंबाची आयुष्यभर व्यवस्था होईल!”
या भल्या माणसाने माझं बोलणं झाल्यावर; क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं, “दिल्या डॉक्टर, तुमच्या फॅमिलीतल्या लोकांना माझ्या हॉटेल मध्ये नोक-या दिल्या…”
हॉटेल आणि रिसोर्टच्या झगमगाटी दुनियेत, तशीच आकर्षक व्यक्तीमत्वाची लोकं लागतात… स्पर्धेत एवढा मोठा व्याप टिकवुन ठेवायचा असतो… अशाही परिस्थितीत आपल्या हॉटेलात भिक्षेक-यांना नोकरी देवु करणारा हा माणुस खरंच किती मोठा आहे ?
या साहेबांनी मला वचन दिलंय, नुसती नोकरीच नाही तर, कपडालत्ता, राहण्याची सोय आणि वर पगार या गोष्टी मी देईन..!
माझे डोळे पाणावले…
“पर्वताएवढी माणसं” हा वाक्प्रयोग पुस्तकात वाचलाय मी… पण तुम्हां सर्वांच्या रुपानं मला नेहमी अनुभवायला मिळतो… हे माझं भाग्य…
विजय शिंदे ही त्यातलेच…!
नेहमी मला वाटतं कि प्रत्येकाच्या तळहातावर रेषा असतात… लोक ज्योतिषाला त्या दाखवुन भविष्य शोधतात.. पण निसर्गाने या रेषांच्याही पुढे प्रत्येक माणसाला दहा बोटं दिली आहेत… ती काम करण्यासाठी आहेत… कोणाला तरी काहीतरी देण्यासाठी आहेत… पडणाऱ्याला सावरण्यासाठी आहेत… चुकलेल्याला वाट दाखवण्यासाठी आहेत… बुडणा-याला वाचवण्यासाठी आहेत… आता माणुस म्हणुन ज्याचं त्याने ठरवायचं, कि या बोटांचा वापर कसा करायचा… रेषांत भविष्य शोधायचं की बोटांनी भविष्य घडवायचं, आपल्याबरोबरच दुस-याचंही!
तर विजय सरांचं बोलणं ऐकुन मी भारावुन गेलो… त्यांनी माझ्या या रस्त्यावरच्या लोकांना सावरण्यासाठी मला अशा प्रकारे हात देवु केला…
आता माझ्या डोळ्यांसमोर २५-३० वर्षाची पण रस्त्त्यात भिक मागणारी तरणीबांड पोरं यायला लागली… रस्ता चुकलेली… अंगात कला आणि रग असुनही उकिरड्यावर खितपत पडलेली… धम्मक असुनही परिस्थितीमुळे षंढ झालेली…
फोनवर बोलणं झाल्यापासुन, या पोरांमध्ये मग मी मिसळायला सुरुवात केली… कधी प्रेमानं शाब्दिक आधार दिला तर कधी याच माध्यमातुन त्यांना गदागदा हलवुन पाहिलं… षंढासारखं जगलात आता षंढासारखं मरु तरी नका असं सांगुन त्यांच्यातलं “पुरुषत्व” जागवण्याचा प्रयत्न केला…
कच्ची माती ही… चाकावर फिरवायचं किती आणि भाजायचं किती एवढं कळलं तरी कुणीही या मातीला सुंदर आकार देवु शकतं…
बस्स… मी ही एव्हढंच तंत्र पाळलं… आणि बघता बघता १० पोरं भिक मागणं सोडुन हॉटेलात कष्ट करायला तयार झालीत..!
या सर्वांना आपापलं सामान घेवुन महाबळेश्वरला जाण्याच्या तयारीनं या असं सांगुन शनिवारी, २७ जानेवारीला सकाळी १०:३० वाजता शनिवारवाड्या शेजारच्या नवग्रह मंदिरात बोलावलं आहे, महाबळेश्वरला कामावर जाण्यासाठी…
विजय शिंदे सर स्वतः त्यांना घेवुन जाण्यासाठी येणार आहेत.
१० जण एकाच दिवशी भिक मागणं सोडुन कामावर रुजु व्हायला जाणार हा माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे, खुप मोठा दिवस असणार आहे…
इतकं सारं लिहीतो मी, पण त्या दिवशीच्या त्या क्षणांना मी शब्दांत मांडु शकेन की नाही… आताच नाही सांगता येणार!
“आमचा पहिला पगार झाल्यावर, सर आम्ही महाबळेश्वरहुन तुम्हाला हे आणणार आणि ते आणणार” असं हे दहाही जण सांगत होते….. मी म्हटलं, “मला कशाला रे… तुमच्या आईबाबांना आणा काहीतरी…” तर म्हणाले, “त्यांन्ला पन आनुच वो, पन त्यांच्या पयले तुमाला देनार, कारन, तुमीच आमचे आय आन बाप पन…”
डोळ्यातुन माझ्या अश्रु तरळले… साहजीकच होतं… आता मी या दहाही पोरांचा बाप झालो ना!!!
Very very nice n good job sir keep it up we r wit u, how I can help u ple let me know….. tnx
ग्रेट काम करताय सर! माणूसकी हरवत चाललेल्या जगात तुमच्यासारखी माणसं आशेचे किरण आहेत. देव मानव रुपात येऊन पतीतांचा उध्दार करतो असं म्हणतात….तुमच्यासारखी माणसं पाहीली की याची साक्ष पटते!
You are not only human Doctor but Doctor of sociology.Experimenting on” ignored old aged of society” is really tough task your trust doing.Hatts off to you .
Doctor,you are not only human Doctor but Doctor of sociology.Experimenting on” ignored old aged of society” is really tough task your trust doing.Hatts off to you .
Doctor,you are not only human Doctor but Doctor of sociology.Experimenting on” ignored old aged of society” is really tough task your trust doing.Hatts off to you .
agdi dolyat Pani ale.i m also very excited for tomorrow as this is going to be the most important day of their life.please also share that part in your blog sir .A great salute to you and Vijay sir .
Bravo ! Good job. Where there is a will there is a way. Congratulations for your efforts. Have faith, in yourself, success is awaiting ahead. All the very best. God Bless.