दहा पोरांचा बाप – उत्तरार्ध

दहा पोरांचा बाप या माझ्या मागील ब्लॉग नंतर, माझ्या या दहा पोरांपैकी, दोन पोरं आज हॉटेलींग कामासाठी महाबळेश्वरला कारने रवाना झाली…

उर्वरीत मुलं येणा-या ८-१० दिवसात हळुहळु पाठविणार आहे…

यांना निरोप द्यायला माझे बंधु समान मित्र प्रकाश बडवे, पवन लोखंडे, राहुल सावंत, राज सगर यांनीही हजेरी लावुन त्यांना शुभेच्छा दिल्या…

माझे मित्र विजय शिंदे यांचा मी शतशः ऋणी आहे, दिलेला शब्द त्यांनी पाळला…!

स्वतःच्या पायावर आता हे उभे राहतील, याचा आनंद किती मोठा असतो, हे पुन्हा अनुभवलं…

पोरांना घराबाहेर पडताना पाहुन, मागं बापाला काय वाटत असेल हे डोळे भरल्यावर प्रथमच जाणवलं…

1 Comment

  1. God Bless!All the best. Wish I could have seen the success in ur eyes.Slow an steady wins the race. So have patience, U r an wii be a successful achiever in ur mission. Hope for the best. Be positive.

Leave a Reply

Your email address will not be published.


*