मुकुंदराव लेले हॉस्पिटल, शनिवारवाड्याजवळ, पुणे,
येथे ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ या वेळात पुढील १० वृद्ध भिक्षेक-यांच्या डोळ्याचे ऑपरेशन्स ठरवली आहेत.
या लोकांना दृष्टी मिळेल हा आनंद..! या शिवाय आणखी दहा लोकांना (ज्यांना चष्मे लागले आहेत), त्यांच्या त्यांच्या आवडीचे चष्मेही देणार आहोत.
एकुण २० भिक्षेक-यांना हा लाभ उद्या मिळेल…
पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातुन यांना एकत्र करत करत, शार्प १० वाजता दवाखान्यात पोचायचे हीच भयंकर कसरत असते… पण रॉबिनहुड टीम आणि माझे सहकारी मित्र यांच्या मदतीने या सर्व बाबी हलक्या होवुन जातात.
त्यांना हाताला धरुन घेवुन जाणं, लहान बाळाला काखेत घेतात तसं घेवुन त्यांना गाडीत बसवणं, रस्ता क्रॉस करणं, वाटेत एकमेकांच्या थट्टा करत जाणं…. जीवाभावाच्या गप्पा मारत जाणं…
छान वाटतं हे सर्व करायला…. आणि त्यांच्या डोळ्यातला आनंद पहायला!!!
Leave a Reply