शारदा मावशी…

रस्त्यात निराधार पणे फिरणा-या तरुण लक्ष्मीला घरी आसरा देणारी…

स्वतः भीक मागुन तीला जगवणारी…

स्वतःच्या मुलीला नोकरीची गरज असतांनाही, या निराधार मुलीला आधी नोकरी द्या म्हणुन पदर पसरणारी…

सुन सदैव भांडत असुनही, तीला आवडतात म्हणुन राजगी-याची चिक्की तीला आवर्जुन देणारी…

माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला सुसंस्कृतपणा म्हणजे काय, हे स्वतःच्या अनुभवावरून रस्त्यावरच सांगणारी…

सर्वांना मदत करणारी… हि शारदा मावशी !

जमेल तसा प्रत्येकाला “हात” देण्याचा ही प्रयत्न करते… स्वतःला एक पाय नसुनही…

हिला मी कृत्रिम पाय लावुन देण्याचं कबुल केलं होतं… कुठल्याही मोफत शिबिराची वाट न पाहता, कोणत्याही लायनीत धक्काबुक्की न सोसायला लावता, ती जिथे आहे तिथुन तीच्या पायाची मापं घेवुन स्पेशल पाय तीच्यासाठी बनवुन घेतलाय…

तीची माझी पहिली भेट एक वर्षापुर्वी जंगली महाराज मंदिर, जंगली महाराज रोड, पुणे येथे झाली होती…

शनीवार दि. १० मार्च २०१८ रोजी सकाळी १०. ३० वाजता याच ठिकाणी तीला सन्मानपुर्वक पाय देवुन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करणार आहोत…

इतरांसाठी ती ज्या भावनेने मदत करते, या तीच्या भावनेला सलाम म्हणुन आणि समाज म्हणुन आपलंही काही उत्तरदायित्व आहे, केवळ या भावनेतुन आपण तीला हा “स्पेशल कृत्रिम पाय” देत आहोत…!

आपण या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असलात किंवा नसलात तरी आपले आशिर्वाद निश्चिंतपणे माझ्या पाठीशी आहेत हे मला माहित आहे…

कारण त्या बळावरच तर इथपर्यंत पोचु शकलो…!

हा स्नेह हि माया अशीच राहो हि विनंती…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*