आज तुम्हां सर्वांच्या आशिर्वादाने प्रशांत सारख्याच आणखी दोघांना आणि एका मावशीला तयार केलंय, महाबळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये काम करण्यासाठी…
परवा शनिवारी नवग्रह मंदिराजवळ, शनिवारवाड्याशेजारी, सकाळी ११ वाजता त्यांना घेवुन जाण्यासाठी स्पेशल गाडी बोलावली आहे…
लाल एस टि चं तिकिट काढुन देवुन, “जा आता महाबळेश्वरला”, हे सांगणं मला जास्त सोपं आहे…
पण तुम्ही कष्ट करायला तयार झाला आहात, आता या क्षणापासुन तुम्ही भिकारी राहिलेला नाहीत, समाजातले एक “सन्माननीय” सदस्य आहात… म्हणुनच सन्मानाने तुमच्यासाठी स्पेशल गाडी केलेय, याची त्यांना जाणिव करुन द्यायचीय…
काम करणा-याला लोकं मान देतात, हे त्यांच्या आणि इतर भिक्षेक-यांच्या मनात ठसवायचं आहे…
यांना बघुन इतरांनाही भिक मागणं सोडण्याची, आपण पण काम करुन “सायबासारखं” रहावं, गाडीत मिरवावं अशी स्फुर्ती यावी, हिच यामागची प्रामाणिक भावना…!
घेता घेता… आपणही उद्या कुणाला देत जावं… असं त्यांनाही वाटेल, तेव्हाच मी जिंकलो… तोपर्यत माझंही ओम भिक्षामदेहि…
असो…
Leave a Reply