केवळ माहितीसाठी..!

१. भिक्षेकरी कूटुंबातील एक तरुण मुलगा आणि दुस-या कुटुंबातील एक तरुण मुलगी… दोघांनाही असाध्य आजार… मागच्या तीन वर्षांपासुन दोघेही औषधासाठी… ती मिळवण्यासाठी झुंजताहेत..!

हि औषधे ससुन हॉस्पिटल मध्ये मोफत मिळतात, पण कागदपत्रे नसल्यामुळे अनंत अडचणी…

तेव्हा काल मी आणि भुवड बाबा व माई, तिघेही आम्ही नेहमीची बाकीची कामं थोडी बाजुला या दोघांना घेवुन ससुनला गेलो…

ससुनच्या सर्व डॉक्टर्स सिस्टर्स मंडळींनी सहकार्य करुन या दोघांनाही पुर्ण मोफत औषधांची सोय करुन दिली आहे… त्यांचे आभार!

भुवड बाबा व माई यांनी पोटच्या लेकरांप्रमाणे त्यांची काळजी घेतली…केवळ आभार या अक्षरांत त्यांना बसवणे बरोबर होणार नाही…

या दोन्ही तरुण पोरांच्या चेह-यावरचं हसु पाहुन… आम्हाला बरंच काही मिळालं..!

२. ८ मार्च “जागतीक महिला दिनानिमित्त” साधारणपणे २० भिक्षेकरी “आज्ज्यांची” नेत्रतपासणी करणार आहोत…

त्यांना या दिवशी “नवी दृष्टी” मिळुन त्या ख-या अर्थाने “सबल” व्हाव्यात हिच प्रार्थना !!!

4 Comments

  1. Dear Sir,

    Please contact Mr. Bafna 9371012306. This is the key person of Jain society. This society is providing the Dialysis services at very affordable rates or free of cost as the case may be.

    Please contact them.

    In case of any issue contact me on 9822267357

    Regards,

    Abhijit

  2. mansa madhala manus jaga karnya karita mala vatate hi ek prerana aahe ani kharach aata mala janiv zali ki mi manus fakt disayala aahe pan bhavanene ajunahi andhalach aahe. mi pan tumachya karyani prerit houn nagpur la swatachy hatani bhikarya na swatachy payavar ubha rahanyacha ek evalasa prayatna karnar aahe sarvache ashirvad hich mazi shakti asel tevya tumcha hat mazya dokyavar asu dya.

  3. प्रति,

    विषय:- विद्यार्थिनीस मोफत डायलिसीस उपचार सुविधा उपलब्ध होणेबाबत.
    महोदय,
    वरील विषयान्वये आपणास विनंती करण्यात येते कि, आपल्या मार्फत पिडीत, गरीब दुर्बल घटकातील व्यक्तींना आर्थिक अथवा सुविधा स्वरुपात मदत केली जाते हे समजले. त्यानुषंगाने (मी प्रल्हाद हंकारे समावेशित शिक्षण तज्ञ मनपा शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आहे समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यासाठी मी काम करतो.
    हिनाबानो रईस शेख ही मुलगी आमच्या मनपा शाळेत इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेत आहे सदर विद्यार्थिनीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असल्याने तिला महिन्यातून किमान 3 ते 4 वेळा डायलिसीस उपचार घ्यावे लागतात. पालकांची आर्थिक परीस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने सदर उपचार खर्च पेलवणे शक्य नाही , तरी सदर विद्यार्थिनीस मोफत उपचार व औषध सुविधा मिळवून देणेबाबत सहकार्य करावे ही नम्र विनंती. सकारात्मक अपेक्षेसह…………………

    आपण विद्यार्थिनीची सर्व माहिती मागितल्यास त्वरित उपलब्ध करून देईल.
    आपला विश्वासू
    प्रल्हाद हंकारे मो.9096190956
    समावेशित शिक्षण तज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published.


*