आज सोमवार २६ मार्च २०१८… तुटलेला षट्कोन सांधण्याचं आजीला आणि सर्वांनाच वचन दिलं होतं…
आज त्याप्रमाणे… सगळं व्यवस्थित जुळुन आलं…
आजीची डॉ. अविनाश वैद्य सरांच्या देहु येथील वृद्धाश्रमात सोय केली आहे…
आणि तीच्या नातीची सौ. प्रभाताई जाधव चालवित असलेल्या प्रेरणा रेनबो होम या लहान मुलींच्या वसतीगृहात सोय झाली आहे.
मला खुप सहृद म्हणाले… दोघींची एकत्र व्यवस्था होणार नाही काय…?
तर वृद्ध आणि मुलं यांना एकत्रित सांभाळणा-या संस्था जवळपास नाहीतच… आणि ज्या थोड्याफार आहेत, तीथे जागाच उपलब्ध नाहीत…
असो… डॉ. अविनाश वैद्य सर (९८३४७४५५३८) यांनी या आजीचा आई म्हणुन स्विकार केला आहे…
आणि सौ. प्रभाताई (९५४५७३४५४५) यांनी या मुलीचा मुलगी म्हणुन स्विकार केलाय…
दोन्ही संस्थांमधील अंतर अत्यंत कमी असुन, आजी आणि नातीला एकमेकींना हवं तेव्हा भेटण्याची मुक्त मुभा या दोन्ही मोठ्या मनाच्या संस्थाचालकांनी दिली आहे…!
हि सगळी मोट बांधायला खडकीचे नगरसेवक तथा स्थायी समिती अध्यक्ष श्री. भापकर यांची खुप मदत झाली…
आमच्या भुवड ताई आणि बाबांनी आजी आणि नातीसाठी भरपुर कपडे पाठवुन दिलेत… हे कपडे घालुन दोघीही हरखल्या होत्या…
चला, वैद्य सर, सौ. प्रभाताई, भुवड ताई आणि बाबा तसेच भापकर साहेब यांच्या माध्यमातुन तुटलेला हा षट्कोन काही अंशी का होईना… सांधता आला…
तुमचंही योगदान आहेच यांत…
उद्या “कोण” कुठे असेल माहीत नाही…हे “कोन” आता मात्र तीथेच असतील… आता तुटणार नाहीत…!
रस्त्यावरच्या या दोघींना हक्काचं घर मिळालं… अन्न वस्त्र शिक्षणाची सोय झाली…
रस्त्यावर टक्के टोणपे खाणारी ही मुलगी उद्या कुणी मोठी व्यक्ती असेल…
रस्त्यात नातीला सांभाळणारी, धास्तावुन रात्रभर जागी असणारी आजी बीनघोर आता झोपेल…
यांहुन काय हवंय आपल्याला…
न जाणो हीच मुलगी उद्या मोठी होवुन पुढे अशा निराधार मुलींना आधार देईल…
रस्त्यावर असे तुटलेले “कोन” सांधेल…
Leave a Reply